Join us

भरदिवसा घरफोडी

By admin | Updated: February 13, 2015 22:31 IST

महाड शहरातील जुने पोस्ट परिसरातील मातृछाया इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील १ लाख १३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरल्याची घटना घडली.

महाड : महाड शहरातील जुने पोस्ट परिसरातील मातृछाया इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील १ लाख १३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरल्याची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती परिसरात दाट लोकवस्तीत भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.मातृछाया इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कल्पना पवार राहतात. गुरुवारी त्या कामानिमित्त बाहेर गेल्या असता चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला असल्याची तक्रार पवार यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.