Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाभा रुग्णालयात डॉक्टरला शिवीगाळ

By admin | Updated: October 20, 2015 02:52 IST

वांद्रे येथील महापालिकेच्या उपनगरीय भाभा रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांनी शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील

मुंबई : वांद्रे येथील महापालिकेच्या उपनगरीय भाभा रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांनी शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी कामबंद आंदोलन केले. आंदोलनानंतर रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली; आणि आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले. शनिवारी सकाळी आसिफ शेख या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी उपचार करून घरी जाण्यास सांगितले. मात्र, आसिफला दाखल करून घेण्याचा आग्रह त्याच्या नातेवाइकांनी धरला. याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी ७ ते ८च्या ४० ते ५० जणांचा जमाव रुग्णालयात घुसला आणि एका महिला डॉक्टरसह दोघांना शिवीगाळ सुरू केली. अखेर आसिफला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. सोमवारी सकाळी हा प्रकार कळल्यावर रुग्णालयातील डॉक्टर - कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. धुडगूस घातलेल्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)