Join us

फटाक्यांपासून सावधान!

By admin | Updated: October 19, 2014 01:02 IST

दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वानाच असते. मात्र, फटाके सावधपणो न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते.

मुंबई: दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वानाच असते. मात्र, फटाके सावधपणो न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. दिवाळीच्या दिवसांत डोळ्य़ांना इजा झाल्यामुळे रुग्णालयात येणा:यांचे प्रमाण हेच सिद्ध करते. 
गेल्या तीन वर्षात फटाक्यांमुळे एका डोळ्य़ाला इजा झालेले 13, तर दोन्ही डोळ्य़ांना इजा झालेले 6 रुग्ण जे.जे. रुग्णालयात आले. दिवाळीच्या दिवसांत दररोज 3क् ते 4क् रुग्ण येतात, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. ‘फटाक्यांमध्ये भरलेली दारू ही प्रत्येकवेळी योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात भरलेली असतेच असे नाही. काहीवेळा फटाका त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जोरात फुटतो. अशावेळी लहान मुलांच्या डोळ्य़ाला इजा होण्याची शक्यता असते. लहान मुले फटाके फोडताना त्यांच्या बरोबर इतर मुले आणि पालकही असतात. प्रत्येकजण टक लावून फटाका फुटण्याची वाट पाहत असतो. फटाका फुटल्यावर होणारा धूर डोळ्य़ात गेल्याने देखील डोळ्य़ाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळेच फटाके न फोडणा:यांनाही याचा त्रस होतो,’ अशी माहिती लहाने यांनी दिली. 
दिवाळीच्या दिवसांतच नाही, तर दिवाळी नंतरही महिनाभर आमच्याकडे लहान मुले येत असतात. कारण डोळ्य़ाला लहानशी इजा झाली, तर आधी घरगुती औषधोपचार, ड्रॉप्स टाकणो असे मार्ग स्वीकारले जातात. त्यानंतरच तज्ज्ञ डॉक्टरांकड आणले जाते, हे चुकीचे आहे, असे लहाने डॉ. लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
एका लहान मुलाची दोन्ही डोळ्य़ांची दृष्टी फटाक्यांमुळे गेली होती. यंदाच्या दिवाळीत आवाज न करणारे फटाके वाजवा. त्यामुळे ध्वनीप्रदूषण देखील कमी होईल. रॉकेट उडवू नका. कारण यामुळे डोळ्य़ांना, शरीराला इजा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यावर भर देणो गरजेचे असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.