नवी मुंबई : महापालिकेने शहरात माजिर्नल स्पेसविरोधात कारवाई सुरू केली आहे. परंतु हॉटेलचालकांच्या अतिक्रमणांना मात्र अभय दिले जात आहे. एपीएमसी परिसरात रहिवाशांनी अनेक वर्षे पाठपुरावा करूनही अतिक्रमण हटविले जात नसल्यामुळे नियमांपेक्षा हॉटेलचालक मोठे आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती’जवळील भरत शत्रुघA व राम लक्ष्मण टॉवरच्या तळमजल्यावर जवळपास 1क् हॉटेल सुरू आहेत. यामधील अनेकांनी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले आहे. भगत ताराचंद हॉटेल चालकांनी पावसाळी शेड मुदत संपल्यानंतही काढलेले नाही. इमारतीच्या आवारामध्ये पाण्याची टाकी, सिलिंडर शेड तयार केले आहे. नागरिकांसाठी व आग किंवा इतर दुर्घटना घडल्यास ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेवरही शेड टाकले आहे. या अतिक्रमणाविरोधात रहिवासी चार वर्षापासून तक्रार करत आहेत. परंतु महापालिका प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. बुधवारीही रहिवाशांनी याविषयी पालिकेच्या अधिका:यांकडे तक्रार करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. याच परिसरातील नानुमल, नानक व इतर अनेक हॉटेल चालकांनीही पावसाळी शेड अद्याप हटविलेले नाही. या शेडचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. महापालिकेच्या विभाग कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या या अतिक्रमणांवर तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने सीवूड व इतर ठिकाणी माजिर्नल स्पेसविरोधात जोरदार कारवाई केली आहे. परंतु हॉटेलचालकांना अभय का दिले जात आहे, नियमांपेक्षा हॉटेलचालक मोठे आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
शहरातील अतिक्रमण हटविणो महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. कारवाई न करणा:या अधिका:यांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. परंतु एपीएमसी परिसरातील हॉटेलविरोधात चार वर्षे तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचा:यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.