Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टचा चौकशी निरीक्षक गजाआड

By admin | Updated: September 4, 2014 03:07 IST

लाच स्वीकारताना बेस्टच्या जी नॉर्थ वॉर्डमध्ये वरिष्ठ चौकशी निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली.

मुंबई : व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना बेस्टच्या जी नॉर्थ वॉर्डमध्ये वरिष्ठ चौकशी निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदाराने राहत्या घरी व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायासाठी व्यावसायिक दराने वीज घेणो आवश्यक होते. मात्र या नियमाबाबत तक्रारदाराला कल्पना नव्हती. दरम्यान जाधव यांनी तक्रारदाराला नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती दिली. याबद्दल दंडात्मक कारवाई होईल, असेही सांगितले. मात्र कारवाई न होण्यासाठी आणि व्यावसायिक मीटरजोडणी करण्यासाठी जाधव यांनी तक्रारदाराकडे 3क् हजार रुपयांची लाच मागितली.  तेव्हा त्याने एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने गुन्हा नोंदवून जाधव यांच्यासाठी बुधवारी सापळा रचला. त्यात ते दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.