Join us  

बेस्टला दररोज ५५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 3:03 AM

एकीकडे तूट भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमात काटकसर सुरू असताना, अनंत अडचणींनी आर्थिककोंडी केली आहे. वाहतुकीची कोंडी, नादुरुस्त ई-तिकीट यंत्र, प्रवासी संख्येत घट अशा असंख्या समस्यांना बेस्ट उपक्रम सध्या सामोरे जात आहे.

मुंबई - एकीकडे तूट भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमात काटकसर सुरू असताना, अनंत अडचणींनी आर्थिककोंडी केली आहे. वाहतुकीची कोंडी, नादुरुस्त ई-तिकीट यंत्र, प्रवासी संख्येत घट अशा असंख्या समस्यांना बेस्ट उपक्रम सध्या सामोरे जात आहे. यामुळे बेस्टला दररोज सुमारे ५५ लाख रुपये नुकसान होत आहे. परिणामी, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी धडपडणाऱ्या बेस्टचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.बेस्टमधून रोज ४२ लाख प्रवासी प्रवास करीत असत. गेल्या दशकभरात वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने ही संख्या २३ लाखांपर्यंत घसरली आहे. मुंबईत वाहनांची संख्याही वाढल्यामुळे वाहतूककोंडीत बेस्टचा प्रवास रखडला. परिणामी, गेल्या दहा वर्षांमध्ये तब्बल २० ते २२ लाख प्रवाशी कमी झाले.प्रवासी संख्या कमी झाल्याचा परिणाम दैनंदिन महसुलावर दिसून येत आहे. नादुरुस्त मशिन, चारशे ते पाचशे बसगाड्या विविध बस आगारांमध्ये दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, वाहतूककोंडीमुळे दररोज दहा टक्के बसगाड्यांच्या फेºया रद्द कराव्या लागत आहेत. यामुळे परिवहन विभागाला दिवसाला ५५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यापूर्वी दररोज तीन कोेटी ७६ लाख २० हजार रुपये महसूल मिळत होता. यात आता ९० लाखांची घट झाल्याचे सूत्रांकडून समजते.दररोज ३,३३७ बसगाड्या चालविण्यात येतात. बसनी दररोज पाच लाख किमीचा प्रवास करणे अपेक्षित आहे.मुंबईच नव्हे, तर ठाणे, नवी मुंबईपर्यंत बेस्ट चालतात. मात्र, बेस्टच्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका नसल्याने वाहतूककोंडीतच बसगाड्या अडकून पडतात. त्यामुळे १० टक्के बसगाड्यांच्या फेºया रद्द कराव्या लागतात.स्वतंत्र बसमार्गिकेसाठी बेस्ट प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच मिडी आणि मिनी बसगाड्याही वाहतूककोंडीवर उतारा म्हणून चालविण्यात येत आहेत.बस कधी व किती वेळेत येणार याची अचूक वेळ सांगणारा अ‍ॅप डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहे.या अ‍ॅपचा प्रयोग बॅकबे आणि वडाळा या दोन बस आगारात करण्यात आला आहे. येथील अडीशे बसगाड्यांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे.

टॅग्स :बेस्टमुंबई