मुंबई : मेट्रोच्या स्पर्धेत उतरलेल्या बेस्ट उपक्रमाला पहिल्याच प्रयत्नात अपयश आले आह़े वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो मार्गावर चालविण्यात येणा:या बस सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा बंद करण्याची वेळ आली आह़े एवढेच नव्हे तर विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या विशेष बस सेवेलाही थंड प्रतिसाद असल्याची कबुली बेस्ट दिनाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने आज दिली़
बेस्ट उपक्रमामार्फत दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी बेस्ट दिन साजरा करण्यात येतो़ मात्र आर्थिक संकटात असलेल्या या उपक्रमात आता काहीच बेस्ट उरलेले नाही़ प्रवासी संख्येत यापूर्वीच घट होत असताना मेट्रो व मोनो रेल्वेशी बेस्टला स्पर्धा करावी लागणार आह़े मात्र वर्सोवा ते घाटकोपर या पहिल्याच मेट्रोपुढे बेस्टचे हाल झाले आहेत़ विमानतळावर पर्यटकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या विशेष बस सेवेची हीच स्थिती आह़े
सिप्झ बस स्थानक ते ज़ेबी़ नगर व मरोळ नाका तसेच ओशिवरा आगारामार्गे आझाद नगर मेट्रो स्थानक या दोन मेट्रो फे:या 25 जून रोजी सुरू केल्या़ या बसच्या प्रत्येक फेरीचा लाभ 4क् ते 45 प्रवासी घेतील, असा बेस्टचा अंदाज होता़ मात्र 1क्-12 लोकच दररोज येत असल्याने हा मार्ग नुकसानात असल्याची कबुली महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी दिली़ (प्रतिनिधी)
नियोजनाअभावी आणलेल्या योजनेचा फियास्को
25 जून रोजी मेट्रो फेरी 1 आणि फेरी 2 सुरू करण्यात आल्या़ मात्र योग्य नियोजनाअभावी अवघ्या महिन्याभरातच ही बस सेवा सुरू ठेवण्याबाबत प्रशासन संभ्रमावस्थेत आह़े मेट्रोचे दर अद्याप निश्चित नाहीत. त्यामुळे या मार्गाचा आढावा घेऊन नियोजनासह या बस सेवेला गती देण्यात येईल, असे गुप्ता यांनी सांगितल़े
बुकिंग एजन्सीशी समन्वय
विमानतळ ते सीबीडी बेलापूर, कॅडबरी जंक्शन ठाणो आणि बोरीवली स्था़ पश्चिम या तीन बस सेवा 2 जुलैपासून सुरू करण्यात आल्या आहेत़ मात्र या बसमधून जेमतेम तीन ते चारच प्रवासी प्रवास करीत आहेत़ त्यामुळे ही सेवा आता बुकिंग एजन्सीबरोबर समन्वय साधून नव्याने सुरू करण्यात येणार आह़े