Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट अर्थसंकल्पाच्या विलनीकरणासाठी कामगारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:09 IST

मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने भाडेतत्त्वावर बसगाड्या घेऊन खासगीकरण सुरू आहे. त्यामुळे बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन ...

मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने भाडेतत्त्वावर बसगाड्या घेऊन खासगीकरण सुरू आहे. त्यामुळे बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा, उपक्रमाचे खासगीकरण राेखा आणि बेस्टला वाचवा, असे साकडे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी घातले.

बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीने आझाद मैदानात माेर्चा काढला हाेता. यामध्ये बेस्टचे कामगार माेठ्या संख्यने सहभागी झाले हाेते. त्यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित नसल्याने मुख्यमंत्री कार्यालयात कामगारांच्या मागण्यांचे निवेदन दिले. सन २००५ पासून वीज दर ठरविण्याचे अधिकार काढून घेण्यात आल्याने बेस्टवर आर्थिक संकट आले आहे.

बेस्ट हे पालिकेचे अविभाज्य अंग असल्याने पालिकेच्या कायद्यातील तरतुदीनुसार बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १८७ कामगारांच्या वारसांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, वारसांना बेस्टच्या नाेकरीत सामावून घ्या आणि बेस्टच्या परिवहन सेवेचे खासगीकरण राेखा, आदी मागण्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केल्या, असे कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले.