Join us  

३० ठिकाणी ‘बेस्ट’ बसगाड्या नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 1:15 AM

लोकल सेवा बंद असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आधार ठरलेल्या बेस्टच्या बसगाड्या अनेक ठिकाणी बंद पडल्या.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचा फटका मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांनाही बसला. त्यामुळे लोकल सेवा बंद असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आधार ठरलेल्या बेस्टच्या बसगाड्या अनेक ठिकाणी बंद पडल्या.यापैकी दुपारपर्यंत २३ गाड्यांची दुरुस्ती करणे शक्य झाले. मात्र पाणी तुंबल्यामुळे सात ठिकाणी मेकॅनिकला पोहोचताही आले नाही. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या दिलासादायक ठरल्या. ३ जूनपासून मुंबईतील जनजीवन पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने सुरू होऊ लागले आहे.मात्र अद्यापही लोकल सेवा बंद असल्याने बेस्ट बसगाड्या मुंबईतील प्रवाशांचा भार उचलत आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३१०० बसगाड्या आहेत. यापैकी बुधवारी २३७५ बसगाड्या प्रत्यक्ष रस्त्यावर होत्या.मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी तुंबल्याने बेस्ट उपक्रमाच्या ३० गाड्या ठिकठिकाणी बंद पडल्या. अशा काही ठिकाणी बेस्टची वाहतूक वळवलीउड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडामार्गे शिवडीभाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केटसायन मेन रोडमार्गे सायन रोड २४मर्निया मस्जिदमार्गे मालाड सब-वे (पूर्व व पश्चिम- लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार-भगतसिंह नगरमार्गे शास्त्रीनगर, गोरेगाव-जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सब-वेदादर हिंदमाता, किंग्ज सर्कल, शीव रस्ता नंबर २४, मालाडसब-वे, वांद्रे टॉकीज, शास्त्रीनगर गोरेगाव, अंधेरी सब-वे, भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाउंड, जे जे जंक्शन, काळाचौकी, सारथी बार, वरळी सीफेस आदी भागांत पाणी साचल्याने या मार्गावरील बेस्ट वाहतूक वळवण्यात आली. ३० ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे बसगाड्या बंद पडल्या. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने त्या त्या ठिकाणी मेकॅनिक पाठवून गाड्या दुरुस्त करून पाणी ओसरल्यावर संबंधित बसआगारामध्ये पाठवल्या. मात्र सात ठिकाणी मकॅनिक पोहोचू शकले नाहीत.

टॅग्स :पाऊस