Join us  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘बेस्ट’ व्यवस्था, अनुयायांच्या सोयीकरिता विशेष गाड्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:31 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाºया अनुयायांच्या सोयीकरिता बेस्टतर्फे विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाºया अनुयायांच्या सोयीकरिता बेस्टतर्फे विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ ते ७ डिसेंबर या काळात दादर स्थानक (पश्चिम) ते शिवाजी पार्कदरम्यान ‘दादर फेरी-२’ या बसमार्गावर संपूर्ण दिवस विशेष बसफेºया चालविण्यात येणार आहेत. विशेषत: ५ डिसेंबर रोजी संपूर्ण रात्र व ६ डिसेंबर रोजी २४ तास ही बससेवा सुरू असेल.बोरीवली रेल्वे स्थानक (पूर्व) येथून कान्हेरी गुंफा दरम्यान बसमार्ग क्रमांक १८८ वर सकाळी ९ ते सायंकाळी ७ दरम्यान बससेवा चालविण्यात येईल. मालाड स्थानक (पश्चिम) ते मार्वे चौपाटी दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ दरम्यान बसमार्ग २७२ वर बस धावतील. बोरीवली स्थानक (पश्चिम) ते गोराई खाडी दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक २४७/२९४ या बसमार्गांवर अतिरिक्त बससेवा चालविण्यात येणार आहे. शहरी प्रवासाकरिता दैनंदिन बसपास ४० रुपये, उपनगरीय प्रवासाकरिता ५० रुपये आणि प्रवर्तन क्षेत्राकरिता ७० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ४ ते ९ डिसेंबर या काळात आरएफ-आयडी स्मार्ट कार्ड ओळखपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे.

टॅग्स :बेस्टमुंबई