Join us  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायींसाठी ‘बेस्ट’ व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:50 AM

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होत असलेल्या अनुयायांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी बेस्ट प्रशासन सज्ज झाले आहे.

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होत असलेल्या अनुयायांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी बेस्ट प्रशासन सज्ज झाले आहे. विजेच्या आवश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासह बेस्टतर्फे बसगाड्यांचीही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. साथीच्या आजाराच्या जनजागृतीसह येथे वैद्यकीय उपचारांबाबत माहितीही दिली जाईल, असे बेस्ट प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज या ठिकाणी ३०१ अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात येणार आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास माहिम दोष निवारण कक्षाशी संपर्क साधता येईल. चैत्यभूमी, शिवाजी पार्क मैदान परिसरात मंडप आणि तंबूंना तात्पुरता वीजपुरवठा धर्मदाय वीज दराने देण्यात येईल. तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी शिवाजी पार्क मैदानात एक खिडकी योजना उभारण्यात येत आहे.दादर स्थानक पश्चिम येथून शिवाजी पार्कदरम्यान मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी पूर्ण दिवस अतिरिक्त बसफेºया कार्यान्वित करण्यात येतील. ५ आणि ६ डिसेंबर रोजी पूर्ण रात्र बससेवा कार्यरत राहील. याव्यतिरिक्त बोरीवली रेल्वे स्थानक ते कान्हेरी गुंफा, मालाड स्थानक ते मार्वे चौपाटी, बोरीवली स्थानक ते गोराई खाडी मार्गावर अतिरिक्त बस चालविण्यात येतील. शिवाय वडाळा आगार ते मालवणी आगार, मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीज केंद्र, शिवाजी पार्क ते विक्रोळी या मार्गावर बेस्टसेवा उपलब्ध असेल. शिवाजी पार्क, वीर कोतवाल उद्यान परिसरातही बेस्ट कार्यान्वित राहणार आहे. शिवाजी पार्क बसचौकी येथील तंबूंच्या परिसरात प्रवासी माहिती केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल. येथे दैनंदिन बस पास वितरित केले जातील.>मार्गदर्शनासाठी बस निरीक्षकांची नियुक्तीप्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी बस वाहक, बस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. आपत्कालीन परिस्थितीकरिता दहा बसगाड्या चैत्यभूमी परिसरात तयार ठेवण्यात येतील. अनुयायांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येणार असून, वैद्यकीय सेवा पुरविल्या जातील. तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली जाईल.