Join us  

तरुण लोकसंख्येचा फायदा करून घ्यावा- डॉ. नरेंद्र जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:06 AM

‘जागतिकीकरण आणि कामगार’ या विषयावर नरेंद्र जाधव बोलत होते

मुंबई : देशाने तरुण लोकसंख्येचा अधिकाधिक फायदा करून घेण्याकडे लक्ष दिले पाहिजे. विकसित देशामध्ये वृद्धांची संख्या वाढत असल्यामुळे तिथे कामगारांची येणाऱ्या काळात गरज भासणार आहे. त्यामुळे याचा आपल्या देशाला नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.परळ येथील नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ लेबर स्टडीज् आणि एलएनएमएल एमआयएलएस अ‍ॅल्युमनी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी एलएनएमएल महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ लेबर स्टडीज्चे माजी संचालक डॉ. आर. एम. तुंगारे यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘जागतिकीकरण आणि कामगार’ या विषयावर नरेंद्र जाधव बोलत होते. याप्रसंगी एलएनएमएल एमआयएलएस, अ‍ॅल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश अहिरे, एलएनएमएल, एमआयएलएसचे संचालक व्ही. एस. देशपांडे, प्रकाश देवदास उपस्थित होते.श्रम आणि रोजगार यांची जागतिकीकरणामध्ये सद्यपरिस्थिती काय आहे, तसेच जागतिकीकरणामध्ये जे विकसित देश आहेत त्यांची प्रगती कशी खुंटते आहे, यावरही जाधव यांनी भाष्य केले.दरम्यान, डॉ. आर. एम. तुंगारे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.