Join us  

आकर्षक, किफायतशीर डाटाद्वारे वर्क फ्रॉम होमसाठी ग्राहकांना लाभ, बीएसएनएलचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 6:17 PM

विद्यार्थ्यांना माफक किंमतीत इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल.

 

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल)  च्या विविध आकर्षक डाटा प्लँनमुळे घरातून काम करणाऱ्या नोकरदारांना, ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक किंमतीत इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल, असा दावा बीएसएनएल तर्फे करण्यात आला आहे. 

599 रुपयांच्या प्लँनमध्ये बीएसएनएल दररोज पाच जीबी डाटा व 100 एसएमएस देत आहे. दुसऱ्या प्लँनमध्ये एफटीटीएच द्वारे 100 जीबी डाटा देण्यात येत आहे. ग्राहकांना त्यांची वैधता संपण्यापूर्वी अनेकदा रिचार्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.  हायस्पीड ब्रॉडब्रँड सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत पुरेशा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बीएसएनएल तर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :बीएसएनएलकोरोना वायरस बातम्याडिजिटलतंत्रज्ञानशिक्षण क्षेत्र