Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम असल्याने घर नाकारले

By admin | Updated: May 28, 2015 01:43 IST

मुस्लीम असल्याने घर भाड्याने देण्यास नकार दिल्याचा प्रकार वडाळा येथे घडला आहे.

मुंबई : मुस्लीम असल्याने घर भाड्याने देण्यास नकार दिल्याचा प्रकार वडाळा येथे घडला आहे. नोकरीसाठी गुजरातहून मुंबईला आलेल्या मिसबाह कादरी (२५) हिच्यासोबत हा प्रकार घडला असून तिने या प्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे.फेसबुकच्या माध्यमातून या तरुणीची मुंबईतील दोन तरुणींशी ओळख झाली होती. वडाळा येथील संघवी हाइट्स गृहनिर्माण सोसायटीतील ३ बीएचके फ्लॅटमध्ये या दोघी राहतात. मुंबईत आल्यावर याच फ्लॅटमध्ये मिसबाह राहणार होती. पण त्याआधी ब्रोकरने तिला ‘तू मुस्लीम असल्याने घर मिळणार नाही,’ असे कळवले. तसेच या सोसायटीत मुस्लिमांना परवानगी नाही. मुस्लीम असल्याने सोसायटीकडून तुला त्रास झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही, असे लिहून दिले तरच घर देऊ, अशी अटही त्याने घातली, असा आरोप मिसबाहने तक्रारीत केला आहे. (प्रतिनिधी)