Join us

दुधावरील बहिष्कार मागे

By admin | Updated: May 19, 2015 01:44 IST

पिशवीबंद दुधाची विक्री करणाऱ्या अमुल, वारणा आणि मदर डेअरी या तीन नामांकित कंपन्यांच्या दुध विक्रीवर टाकण्यात येणारा बहिष्कार विक्रेत्यांनी तूर्तास मागे घेतला आहे.

मुंबई : पिशवीबंद दुधाची विक्री करणाऱ्या अमुल, वारणा आणि मदर डेअरी या तीन नामांकित कंपन्यांच्या दुध विक्रीवर टाकण्यात येणारा बहिष्कार विक्रेत्यांनी तूर्तास मागे घेतला आहे. कंपन्यांसोबत सुरू असलेल्या सकारात्मक चर्चेमुळे ३० मेपर्यंत बहिष्काराच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचे अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाचे जगदीश कट्टीमणी यांनी सांगितले.कट्टीमणी म्हणाले की, ग्राहकांना वेठीस धरून विक्रेत्यांना कोणतीही मागणी मान्य करायची नाही. दुधावरील एमआरपी वाढवून ग्राहकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे किंमत वाढवून कमिशनवाढ द्यावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी विक्रेत्यांना दोषी धरू नये. वारणा, मदर डेअरी आणि अमुल कंपनीसोबत चर्चा सुरू आहे. तरी ३० मेपर्यंत तोडगा निघाला नाही, तर बहिष्काराचा निर्णय बैठकीअंती घेण्यात येईल. दरम्यान, एक आणि दोन रुपये कमिशनवाढ देण्याने विक्रेत्यांचे समाधान होणार नसल्याचे संघाने सांगितले. (प्रतिनिधी)