Join us  

बोरीवलीत मधमाश्या चावण्याचे प्रमाण वाढले, परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 4:41 PM

बोरीवलीत मधमाश्या चावण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बोरिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आणि मधमाश्यायांची पोळी काढण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने स्वतंत्र यंत्रणा तयार करावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या  नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लोकमतशी बोलतांना केली.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई :  बोरीवलीत मधमाश्या चावण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बोरिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आणि मधमाश्यायांची पोळी काढण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने स्वतंत्र यंत्रणा तयार करावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या  नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लोकमतशी बोलतांना केली.

अलिकडेच बोरीवलीच्या वीर सावकर उद्यानात मधमाशी चावल्यामुळे पंकज शाह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर इतर दोघे जखमी झाले होते. तर काल दुपारी बोरीवली पश्चिम येथील अनिल देसाई नगर येथील हिम्मत नगर, जिमखाना रोडवरील जय सिद्धीविनायक सोसायटीत खाजगी कंत्राटदार मफतलाल चौधरी यांचाकडील झाडे तोडणारा कामगार हसमुख खान यांना  येथील झाडे तोडताना मधमाश्यांनी जोऱ्यात चावा घेतला. त्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. मधमाश्या चावण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे बोरीवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यावर मुंबई महानगर पालिकेने अशा घटना रोखण्यासाठी आप्तकालिन यंत्रणा प्रभावीपणे राबवली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

याबाबत सविस्तर माहिती देतांना मफतलाल चौधरी यांनी सांगितले की, या सोसायटीत काल दुपारी 12.30च्या सुमारास या सोसायटीत झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम सुरू होते. या फांद्या तोडतांना मधमाश्यांच्या पोळ्याला धक्का लागला असावा. त्यामुळे या चवताळलेल्या मधमाश्यांनी हसमुख खान या आमच्या कामगारावर वर हल्ला केला.आणि त्याच्या चेहरा,पाठीवर जोरदार चावा घेतला. त्यामुळे पालिकेच्या उद्यान खात्याचा झाडांच्या फांद्या कापणारा हा लाकूडतोड्या देखिल या घटनेत जखमी झाला.

मफतलाल चौधरी यांनी त्वरित खान यांना घेऊन महापालिकेच्या कांदिवली पश्चिम येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेलो. मात्र दोन तास मला योग्य उपचार मिळाले नाही.अखेर दहिसर पूर्व येथील मानवकल्याण या खाजगी हॉस्पिटलमध्ये खान याला त्वरित उपचार मिळाले. पालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी मोलाचे सहकार्य करून आणि पालिका यंत्रणा राबवून येथील मधमाश्यांच्या पोळ्यावर फवारा मारून पोळे उद्वस्त केले.

मधमाशी चावणं हे  प्रकार गावाकडे पूर्वी व्हायचे. परंतु, आता असे प्रकार मुंबईतही घडत असून बोरीवलीमधील वीर सावकर उद्यानात मधमाशी चावल्यामुळे पंकज शाह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता,तर दोघे जखमी झाल होतेे. त्यामुळे अशाप्रकारे मधमाशांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे काय यंत्रणा आहे,असा खडा सवाल नगरसेविका शितल म्हात्रे यांनी हरकतीच्या अलिकडेच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हरक्तीच्या मुद्याद्वारे केला होता. मात्र यावर पालिका प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.आता काल कामगार हसमुख खान यांना मधमाश्या चावल्यामुळे बोरीवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि एका राज्याचा अर्थसंकल्प असा लौकिक असलेल्या मुंबई महानगर पालिकेने भविष्यात अशा घटना घडू नये आणि घडल्यास त्यावर वेळीच आळा घालण्यासाठी प्रभावी आपत्कालीन यंत्रणा प्रणाली राबवावी अशी आग्रही मागणी नगरसेविका म्हात्रे यांनी केली.  मुंबईत दुघर्टनांमध्ये सापडलेल्यांना वाचवण्यासाठी मुंबई अग्निशमन दल कार्यरत असले तरी त्यांना मधमाशींचं पोळ काढण्याचं प्रशिक्षणच नाही. अशाप्रकारे मधमाशांचे प्रकार वाढल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी काही उपाययोजना पालिकेकडे आहे काय?मुंबतील झाडावर अशाप्रकारची मधमाशांची पोळी असून ती काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा पालिका प्रशासनाने तयार करण्याची मागणी त्यांनी शेवटी केली आहे.

टॅग्स :मुंबई