Join us
Daily Top 2Weekly Top 5

रविनामुळे 'त्या' चिमुकलीला भेटले आई-वडील

By admin | Updated: October 12, 2016 18:17 IST

तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधिन केले आहे. संकटात सापडलेल्या त्या सात वर्षांच्या मुलीची मदत करुन रविनाने कलाकारांमध्ये असणारी माणसुकी दाखवून दिली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - मुंबईतील जूहू परिसरात अनेक मुलांमध्ये दु:खी अवस्थेत असणाऱ्या आणि आई वडिलांपासून दुरावलेल्या एका सात वर्षाच्या मुलीला अभिनेत्री रविना टंडनने तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधिन केले आहे. संकटात सापडलेल्या त्या सात वर्षांच्या मुलीची मदत करुन रविनाने कलाकारांमध्ये असणारी माणसुकी दाखवून दिली आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार रविना काल रात्री उशीरा एका कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावल्यानंतर घरी परतत होती. त्याचवेळी तिची एका सात वर्षाच्या मुलीवर पडली. ती मुलगी रडत असल्याचे पाहून रविनाने कोणताही विचार न करता तिची मदत केली. यावेळी या सात वर्षाच्या मुलीला जखम देखील झाली होती. जखमेची वेदनांनी आणि आपल्या घरापासून दूर असल्याने ती रडत रस्त्याच्या बाजूला उभी राहिली होती.

हिंदुस्थान टाईम्सच्या माहितीनूसार, या सात वर्षाच्या चिमुकलीला कोणीही मदत करण्यास तयार नव्हते. कोणताही रिक्षावाला तिच्या घरापर्यंत सोडण्यास तयार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रविनाने स्वत: पुढाकार घेऊन मुलीला सुखरुप घरी पोहचवले. रविनाने या वृत्ताला दुजारा दिला असून या परिस्थितीमध्ये त्या मुलीला माझ्या मदतीची गरज होती, तिची सुरक्षितता लक्षात घेऊन मी या मुलीला तिच्या आई वडिलांपर्यंत पोहचविले, अशी प्रतिक्रिया रविनाने दिली.