Join us

सागरविहारच्या धर्तीवर होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण

By admin | Updated: May 30, 2015 22:27 IST

नवीन पनवेल येथील गाढी नदीलगतच्या होल्डिंग पाँडचा पावसाळी पाण्याचा निचरा करण्याबरोबरच आता विरंगुळ्यासाठीही उपयोग करून घेण्यात येणार आहे.

प्रशांत शेडगे - पनवेलनवीन पनवेल येथील गाढी नदीलगतच्या होल्डिंग पाँडचा पावसाळी पाण्याचा निचरा करण्याबरोबरच आता विरंगुळ्यासाठीही उपयोग करून घेण्यात येणार आहे. सिडकोने या परिसराचे नवी मुंबईतील सागर विहारच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता सुमारे दीड कोटींचा खर्च अपेक्षित असून निविदाही प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.कळंबोलीबरोबरच सिडकोने नवीन पनवेल नोड विकसित केला आहे. २००५ च्या प्रलयानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन पनवेल सेक्टर १४ येथील विसर्जन घाटाजवळ सिडकोने होल्डिंग पाँड तयार केला. या पाँडला पावसाळी नाले जोडण्यात आले असून गाढी नदी लगत असल्याने पावसाचे पाणी पात्रात निघून जाते. नदीला पूर आला तरी होल्डिंग पाँडमुळे पाणी शहरात घुसत नाही. त्यावेळी पंपाव्दारे पाँडमधील पाणी उपसण्याची सुविधाही करण्यात आलेली आहे. मात्र सध्या पाँडच्या आवारात झाडेझुडपे वाढली आहेत, डेब्रिज व कचराही टाकला जात असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. परिसरातील मित्रमंडळाकडून अधूनमधून विसर्जन घाटाची स्वच्छता केली जाते. मात्र ती तोकडी पडते. त्यामुळे हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेवक संदीप पाटील यांनी सिडकोला दिला. त्यानंतर सिडकोकडून सर्वेक्षण, आराखडा व अंदाजपत्रक तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे.एका वर्षात प्रकल्प मार्गी!होल्डिंग पाँडच्या कामाची निविदा प्रसिध्द झाली असून जुलै महिन्यात एजन्सी नियुक्त करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. वर्षभरात काम पूर्ण करण्याचा संकल्प सिडकोने केला आहे.एक कि.मी. पट्टा विकसित होणारहनुमान मंदिर ते विसर्जन घाट हा एक कि.मी. पट्ट्याचा विकास सिडको करणार आहे. वाढलेली झाडेझुडपे काढून त्या जागी फुलझाडे व शोभेच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहेत. होल्डिंग पाँडला पिंचिग करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त प्रशस्त असा जॉगिग ट्रक विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. बसण्याकरिता आसन व्यवस्था तसेच दिवाबत्तीची सोय सिडको करणार आहे. या व्यतिरिक्त कारंजे बसविण्याकरिता प्राधिकरण विचाराधीन आहे.सिडकोचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याकरिता निविदा भरण्याची प्रक्रि या सुरू आहे. येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. संबंधिताला नऊ महिन्यांची मुदत देण्यात येणार असून एक वर्षाच्या आत नवीन पनवेल येथील होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण होईल. - प्रदीप तांबडे, अधीक्षक अभियंता, नवीन पनवेल, सिडको.