Join us

अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:06 IST

मुंबई: अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह चौघांना समतानगर पोलिसांनी अटक केली, तर अन्य दोघे फरार ...

मुंबई: अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह चौघांना समतानगर पोलिसांनी अटक केली, तर अन्य दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

राहुल शर्मा असे या हल्ल्यात जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे, जो समतानगर परिसरात जयहिंद चाळ येथे राहणारा आहे.

मंगळवारी जेव्हा तो पोईसर येथे सामानाची डिलिव्हरी द्यायला गेला होता, त्यावेळी मोठा पाऊस सुरू झाला. त्यामुळे हातातील सामान भिजू नये यासाठी शिवाजी मैदान येथील पोईसर शिवसेना शाखेच्या छताचा आसरा घेत तो आडोशाला उभा राहिला. तेव्हा चंद्रकांत निनवे याने त्याच्या सामानावर पाय दिला. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. तेव्हा शाखेत बसलेले शाखाप्रमुख संजय मांजरे, विनय निनवे आणि अन्य लोकांनी त्याला लाकडाच्या बांबूने मारहाण केली, असे त्याने पोलिसांना सांगितले. या मारहाणीत त्याच्या डोळे आणि डोक्यावर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.