Join us  

सूर्यग्रहण अवश्य पाहा; पण सुरक्षिततेची काळजीही घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 2:35 AM

अंनिसचे आवाहन : शाळांत ग्रहण पाहण्यासाठीचे कार्यक्रम

मुंबई : ग्रहण हे आयुष्यात कमी वेळा पाहण्याचा, अनुभवाचा योग येतो. ग्रहण अवश्य पाहा. पण सुरक्षिततेची काळजी घेऊन. सोलार फिल्टर्स चष्मे मिळतात. त्याचा वापर करून जीवनातील नैसर्गिक घटनेच्या आनंदात सहभागी व्हा, असे आवाहन करत महाराष्ट्र अंनिस, खगोलप्रेमी संघटना, विज्ञानप्रेमी यांना ग्रहण दाखविण्याचा कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांत आयोजित करण्यात आला आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहण २६ डिसेंबर रोजी भारतातून दिसणार असून, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येथून दिसणारच असताना उर्वरित भारतातून हे ग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसेल. मुंबई येथून सकाळी ८.०४ ते १०.५५ या वेळेत सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहणाबाबत ज्या अंधश्रद्धा आहेत; त्या दूर करण्याचे काम यानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. समितीच्या वतीने हे सूर्यग्रहण शाळाशाळांमध्ये दाखविण्यासाठीचे आयोजन केले आहे. समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डी.ए.व्ही.(दयानंद) शाळा, मालाड (प.), विदर्भ विद्यालय, मालाड(पू.), नंदादीप विद्यालय, गोरेगाव(पू.), प्रभादेवी महानगरपालिका शाळा, संकुल प्रभादेवी यांसह कुर्ला, घाटकोपर येथील शाळांतील विद्यार्थ्यांना हे सूर्यग्रहण दाखविण्यात येईल.वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरमध्ये सूर्यग्रहण पाहता यावे याकरिता व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत ही व्यवस्था असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे सूर्यग्रहण पाहण्याकरिता येण्यासाठी सेंटरने नोंद करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी नाव नोंद केल्याचे सेंटरच्या वतीने सांगण्यात आले.शाळा, युवक, विद्यार्थ्यांसाठी टॅगलाइनअवकाशातील सूर्याभोवती, अंधश्रद्धांचा किती वेढा रेनव्या युगाचे नायक आम्ही, अज्ञानाच्या बेड्या तोडा रेच्सूर्यग्रहण हे अपशकुन नाही च्सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे च्सूर्यग्रहणाबद्दल भीती बाळगू नका च्गर्भवती महिलेच्या गर्भावर ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही च्ग्रहण काळात अन्न, पाणी सेवन करू शकता च्घरातील अन्न, पाणी टाकून देण्याची गरज नाही च्सोलार गॉगल्सने सूर्यग्रहण पाहाडॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे २६ डिसेंबर रोजी गोदुताई परुळेकर उद्यान, चांदीवाला कॉम्प्लेक्स समोर, चंदनवाडी, ठाणे पश्चिम येथे सर्वांना सकाळी ८.०४ ते १०. ५५ वाजेपर्यंत खंडग्रास सूर्यग्रहण दाखवून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण उपस्थित राहून ग्रहणविषयक माहिती देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. यावेळी ग्रहण पाहण्यासाठी सोलार चष्म्यांची सोय करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईउष्माघात