मुंबई : संपूर्ण जून महिन्यामध्ये हुलकावणी देणा:या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. पावसाळा सुरू झाल्यामुळे काही प्रमाणात मुंबईकर सुखावले असले तरी साचलेल्या पाण्यात पाय टाकताना मुंबईकरांनी सावधानता बाळगली पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. साचलेल्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) हा आजार होण्याचा धोका वाढतो. गेल्या तीन वर्षात लेप्टोमुळे 12 जणांचा बळी गेला आहे.
पावसाला सुरुवात झाली की, साचलेल्या पाण्यातून लहान मुलांच्या बरोबरीनेच, मोठय़ांनाही चालण्याचा मोह टाळता येत नाही. मात्र काही वेळा मोह नाही, तर संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले असल्यामुळे पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा वेळीही पायाची जखम उघडी ठेवू नका. ठेच लागल्यामुळे पायाला जखमा होतात. पावसाळ्यात शू बाईटमुळे पायाला जखमा होण्याचे प्रमाण जास्त असते. अशी प्रकारची पायाला जखम झाली असताना, गंमत म्हणून जरी पाण्यातून चालत गेलात, तर लेप्टो होण्याचा धोका वाढतो. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये उंदराच्या मूत्रद्वारे लेप्टोस्पीरा नावाचा जंतू मिसळला जातो. याच पाण्यातून चालत जाताना पायाला झालेल्या जखमेच्या माध्यमातून लेप्टोस्पीरा शरीरात प्रवेश करतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास लेप्टो होण्याचा धोका अधिकच वाढतो.
2क्11मध्ये लेप्टोचे 141 रुग्ण आढळून आले होते, तर 6 जणांचा मृत्यू झाला होता. 2क्12मध्ये 327 तर 2क्13मध्ये 233 रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही वर्षात तीन जणांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. जून 2क्14र्पयत लेप्टोचे 15 रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाने दिली.
लेप्टो झाल्यावर ताप चढतो. थंडी वाजते. अंग दुखून येते. हाडे मोडल्यासारखी वाटतात. अंगावर पुरळ येऊ लागते. तापावर योग्य वेळी उपचार न झाल्यास रक्तातील पांढ:या पेशी कमी होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. प्राथमिक अवस्थेत लेप्टोचे निदान झाल्यास आजार पूर्णपणो बरा होतो. ताप आल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. पायाला झालेली जखम उघडी ठेवू नका, साचलेल्या पाण्यातून चालणो टाळा, घरी आल्यावर स्वच्छ पाय, चप्पल धुवा, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अनिल पाचणोकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय?
उंदराच्या मूत्रद्वारे लेप्टोस्पीरा नावाचा जंतू साचलेल्या पाण्यात मिसळला जातो. याच पाण्यातून एखादी व्यक्ती चालत गेली आणि तिच्या पायाला जखम झाली असेल तर त्या व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) हा आजार होऊ शकतो.