Join us  

सावधान! हे तर भविष्यातील संकट, संप दडपण्यासाठी एसटीचा 'खासगी' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 12:07 PM

सध्या सुरू असलेल्या एसटी संपाला राज्यभरातून प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील बहुतांशी एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने ओला बससाठी विशेष परवानगी दिली आहे.

महेश चेमटे/मुंबई : सध्या सुरू असलेल्या एसटी संपाला राज्यभरातून प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील बहुतांशी एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने ओला बससाठी विशेष परवानगी दिली आहे. एसटी कर्मचा-यांचा संप मोडून काढण्यासाठी एसटी प्रशासन खासगी बस चालकांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात ओला बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे, दादर-औरंगाबाद, दादर-औरंगाबाद या मार्गावर ओला बस चालवण्यात येणार आहे. बस भाडे किती असेल यावर सध्या तरी बोलायला संबंधित अधिकारी बोलण्यास तयार नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार वातानुकूलित बस प्रमाणे तिकीट दर आकारण्यात येणार आहे.

खासगी बस सेवा सुरू असल्याची सध्या तरी काही कल्पना नाही. हा निर्णय आरटीओ स्तरावर घेण्यात आला असेल, असे परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितले. त्यामुळे परिवहन विभाग सध्या खासगी बस सेवेबाबत अनभिज्ञ आहे. एस टी प्रशासनांकडून वेतनवाढीसाठी ठोस पावले घेण्यात आलेली नाही. यामुळे मान्यताप्राप्त संघटनेने संप करण्याचा निर्णय घेतला. या बाबतची नोटीस दिल्यानंतर सोमवारी मध्यरात्री संप पुकारण्यात आला. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीतून संपावर तोडगा निघाला नाही. परिणामी राज्यात बहुतांशी भागात उत्स्फूर्तपणे संपात सहभाग घेतला.सध्या प्रशासन खासगी सेवा सुरू करून संप दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारे खासगी बस सेवा सेवा करण्यात आली.शहरात अशी सेवा सुरू होताच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आता आरटीओ काय कारवाई करते हे पाहणे गरजेचे आहे. हे तर भविष्यातील संकटशहरात पारंपरिक (काळी पिवळी) टॅक्सी संप झाल्यानंतर खासगी टॅक्सी चालकांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर पारंपरिक टॅक्सीचे वस्तुस्थिती समोर आहे. याच धर्तीवर एसटी संपावर उपाय म्हणून खासगी बसचा निश्चित करण्यात आले आहे. खासगी चालक मंदीत संधी साधत असून हे तर भविष्यातील संकट असल्याचे एसटी च्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :एसटी संप