Join us
Daily Top 2Weekly Top 5

बी.डी.डी. चाळीसाठी मनसे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:06 IST

मुंबई : बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासासंदर्भात शासकीय पातळीवर होणाऱ्या सर्व बैठकांमध्ये अखिल बी.डी.डी चाळ नवनिर्माण वेलफेअर रहिवासी संघ यांना निमंत्रित ...

मुंबई : बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासासंदर्भात शासकीय पातळीवर होणाऱ्या सर्व बैठकांमध्ये अखिल बी.डी.डी चाळ नवनिर्माण वेलफेअर रहिवासी संघ यांना निमंत्रित करण्यात यावे; जेणेकरून शासकीय यंत्रणा व रहिवासी यांच्यामध्ये समन्वय साधून पुनर्विकास प्रकल्प सुरळीत मार्गी लागण्यास मदत होईल, असे म्हणणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांडले आहे. अखिल बी.डी.डी. चाळ नवनिर्माण वेलफेअर रहिवासी संघाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश हा वरळी, डिलाईल रोड, नायगाव, शिवडी परिसरातील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये रहिवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणे व त्यांच्या अडीअडचणी सोडविणे आहे, असे देखील सांगण्यात आले. दरम्यान, बैठकांसाठीच्या निमंत्रितांबाबतची मागणी मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, म्हाडा उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक/व्यवस्थापक विकास विभाग चाळी यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.