Join us

बॅ. अंतुलेंच्या निधनामुळे शोककळा

By admin | Updated: December 2, 2014 22:55 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए. आर. अंतुले यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाल्याने कोकणसह रायगड नगरीत दु:खाचा डोंगर कोसळला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए. आर. अंतुले यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाल्याने कोकणसह रायगड नगरीत दु:खाचा डोंगर कोसळला. मुरुड तालुका हा काँग्रेस आयचा बालेकिल्ला मानला जातो. अंतुले यांना प्रत्येक निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळवून देण्यात या तालुक्याचा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. असंख्य लोकांना आधारवड वाटणारे अंतुले निवर्तल्याचे वृत्त येताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले. रेवदंडा पुलाचे काम हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी काम असल्याचे स्थानिक सांगतात. या पुलामुळेच अलिबाग - मुरुड हे तालुके जोडले जावून पर्यटनाचे दालन लोकांना उपलब्ध झाले.