Join us

'लढाई अजून संपलेली नाही, नागरिकांनी अधिक दक्ष राहायला हवे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 01:38 IST

पण ही लढाई अजून संपलेली नसून लोकांनी यापुढील काळातही कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

मुंबई : वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा, तसेच उत्कृष्ट महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.पालकमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, कोविड योद्ध्यांच्या कामगिरीमुळेच मुंबईमध्ये आपण कोविडवर नियंत्रण प्राप्त करू शकलो. हा लढा कोविडपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा आहे. मला खात्री आहे की, ही लढाईसुद्धा आपण नक्कीच जिंकू. पण ही लढाई अजून संपलेली नसून लोकांनी यापुढील काळातही कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.कोरोनामुक्तीसाठी कार्य करणारे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिमा खांडावाला, डॉ. ज्योती दराडे, डॉ. हरिता सावे, ट्रामा केअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या माने, सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार, सहायक महापालिका आयुक्त किशोर गांधी, संतोष दोंडे, अजित अंबी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने, पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक झुबेदा मोहम्मद रजा शेख, पोलीस कर्मचारी विवेकानंद साळुंखे, नंदकुमार वारंग, तुषार चौधरी, सचिन राठोड तसेच दिवंगत सहायक महापालिका आयुक्त अशोक खैरनार यांच्या पत्नी रत्ना खैरनार यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन पालकमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.महसूल दिनानिमित्त निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार झाला. अपर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसीलदार संदीप थोरात, नायब तहसीलदार सुरेश महाला यांच्यासह महसूल कर्मचारी रोहन पाटोळे, सुजाता काळे, कांचन पाटील, योगेश मानकर, महादेव पाष्टे,सुभाष सोंडकर यांना सन्मानित करण्यात आले.>राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहणमुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी माधव पाटील, उपजिल्हाधिकारी सूर्या कृष्णमूर्ती, सुषमा सातपुते, भागवत गावंडे, तहसीलदार श्यामसुंदर सुरवसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी उपस्थित होते.