Join us

बुडत्याला जीवरक्षकांचा आधार; गस्त वाढविणार

By admin | Updated: June 12, 2016 04:40 IST

जुहू चौपाटीवर शुक्रवारी पाण्यात उतरलेल्या पाचजणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला़ पावसाळ्यात अशा दुर्घटना वाढत असून धोक्याच्या सूचनांकडे तरुणाई दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे सावधगिरी म्हणून

मुंबई : जुहू चौपाटीवर शुक्रवारी पाण्यात उतरलेल्या पाचजणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला़ पावसाळ्यात अशा दुर्घटना वाढत असून धोक्याच्या सूचनांकडे तरुणाई दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे सावधगिरी म्हणून महापालिकेने सहा प्रमुख चौपाट्यांवर पोलिसांच्या बरोबरीने गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार पावसाळ्यात जीवरक्षकांची फौज डोळ्यांत तेल घालून गस्त देणार आहेत़मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी हजेरी लावली. त्यामुळे चौपाट्यांवरही गर्दी होते़ अशा वेळी त्यांच्यावर नजर व अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी ११ जीवरक्षक आहेत़ त्यात आता आणखी ३० तात्पुरते जीवरक्षक नेमण्यात येणार आहेत़ त्याचबरोबर २० जीवरक्षक तराफेही तैनात असणार आहेत़ (प्रतिनिधी)

- गेल्या ३० दिवसांमध्ये समुद्रात तरुण बुडल्याच्या तीन घटना घडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येत आहे.- गिरगाव, दादर, जुहू, गोराई, मार्वे-एरंगल, वर्सोवा, मढ, आक्सा, मनोरी अशा नऊ चौपाट्या मुंबईत आहेत़ यापैकी गिरगाव, जुहू, गोराई, आक्सा, वर्सोवा, मढ येथे मुंबईकरांची गर्दी असते़