Join us
Daily Top 2Weekly Top 5

बार मालक अपहरण, मारहाण प्रकरणी चौघे अटकेत

By admin | Updated: April 14, 2017 03:55 IST

खंडणी मागितल्याची तक्रार केल्याचा राग काढत रट्टी कृष्णा पटनायक ऊर्फ सोनू या बार मालकाचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली होती.

मुंबई : खंडणी मागितल्याची तक्रार केल्याचा राग काढत रट्टी कृष्णा पटनायक ऊर्फ सोनू या बार मालकाचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी बुधवारी चौघांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.श्रीकांत जाधव, अभिजय शिंदे, सुशील दळवी, सागर साळवी अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. चौघांना दहिसरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हाही कबूल केला आहे. सोनू यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार प्रकाश पवार हा असून तो मात्र अद्याप पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला नाही. रविवारी दुपारी पवारने सोनू यांना दहिसरच्या संभाजीनगरमध्ये बोलावले. जिथे त्यांचे अपहरण करुन हृषीवन परिसरात नेण्यात आले. पवार आणि त्याच्या साथीदारांनी सोनू यांना बेदम मारहाण करुन पसार झाले होते. दोन वर्षांपूर्वी पवार विरोधात खंडणी उकळल्याची तक्रार केल्याच्या रागात त्याने हा प्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. (प्रतिनिधी)