Join us  

बाप्पा घेऊन आला 'सुखवार्ता'... तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 8:15 AM

सणासुदीआधी देणार लसीचे ११० कोटींहून अधिक डोस

ठळक मुद्देसध्या दररोज कोरोना लसीचे ८५ लाख ते एक कोटीहून अधिक डोस देण्यात येत आहेत. अशा वेगाने मोहीम राबवली गेल्यास सर्व प्रौढ व्यक्तींना लसीचा पहिला डोस तरी मिळालेला असेल. 

हरीश गुप्तानवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांनंतर देशात कोरोना साथीची स्थिती आणखी बिकट होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन सध्या तशी पूर्वतयारी केली जात आहे. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची तूर्त तरी शक्यता नाही, असे केंद्र सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक तज्ज्ञगटाचे प्रमुख प्रा. एन. के. अरोरा यांनी सांगितले. त्यांच्या या उद्गारांनी करोडो भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचे ११० कोटींहून अधिक डोस लोकांना दिले जाण्याची शक्यता आहे.लसीकरण मोहिमेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच इंडियन सार्स-कोव्ह-२ जिनोमिक्स कॉन्सोर्टियमचे सहअध्यक्ष असलेल्या प्रा. एन. के. अरोरा यांनी दिलासा देतानाच सावध राहण्याचा इशाराही दिला आहे. 

३० टक्के लोकांना धोका अधिकnसध्या दररोज कोरोना लसीचे ८५ लाख ते एक कोटीहून अधिक डोस देण्यात येत आहेत. अशा वेगाने मोहीम राबवली गेल्यास सर्व प्रौढ व्यक्तींना लसीचा पहिला डोस तरी मिळालेला असेल. nमात्र, अजूनही ३० टक्के लोकांना लस मिळाली नसल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन जनतेने सणासुदीच्या दिवसांत व नंतरही प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन प्रा. एन. के. अरोरा यांनी केले.

गर्दी करू नका, अन्यथा संकट अटळn देशात अनेक ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले, भरगच्च गर्दीचे कार्यक्रम होत राहिले तर मात्र कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. n त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना जाणे सध्या तरी टाळले पाहिजे, असेही अरोरा यांनी स्पष्ट केले. 

सध्या कुठे जास्त रुग्ण?गेल्या काही आठवड्यांत भारतामध्ये दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांचे प्रमाण ३० ते ४५ हजारांच्या दरम्यान आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण केरळ, ईशान्य भारतातील काही राज्ये व महाराष्ट्र, दक्षिण भारतातील राज्यांच्या काही जिल्ह्यांत सापडत आहेत.

 

टॅग्स :गणेशोत्सवकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या