Join us

महापालिकेकडून उतरवली जातात राममंदिर निधी संकलनाची बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:35 IST

खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापौरांकडे व्यक्त केली नाराजीमनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अयोध्या येथील राममंदिर उभारण्याच्या ...

खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापौरांकडे व्यक्त केली नाराजी

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अयोध्या येथील राममंदिर उभारण्याच्या कार्यासाठी मुंबईतून भाजप कार्यकर्ते ठिकठिकाणी देणगी गोळा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका व पोलीस राममंदिराच्या निधी संकलनाचे बॅनर काढत असल्याबद्दल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, देशातून तसेच विदेशांतूनसुद्धा मंदिर निर्माणकार्यास श्रीरामभक्तांकडून देणगी देण्यात येत आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी राममंदिर उभारण्याच्या कार्याला दिला आहे. शिवसेनाप्रमुखांना राममंदिराबद्धल विशेष आस्था होती. देशात राममंदिर निर्माण कार्याला काँग्रेस व अन्य पक्षांकडून विरोध होत असताना शिवसेनाप्रमुख व संघपरिवार भाजपच्या मागे खंबीरपणे उभा होता, याची आठवणही खासदार शेट्टी यांनी आपल्या पत्राद्वारे करून दिली आहे.