Join us

गणेशपुरी पोलीस स्टेशनमधून बलात्कारी फरार

By admin | Updated: April 10, 2015 23:51 IST

उसगाव बंधारा (भिवंडी) येथील अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन दोन दिवस तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी रमेश वंजारी (५०) रा. कोलोसी

पारोळ : उसगाव बंधारा (भिवंडी) येथील अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन दोन दिवस तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी रमेश वंजारी (५०) रा. कोलोसी (वसई) याला बलात्काराच्या आरोपाखाली गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या कस्टडीत ठेवले होते. मात्र, तो पोलीस स्टेशनमधून फरार झाला. यामुळे पोलिसांकडे संशयाची सुई वळते आहे. या मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी मुंबई येथे हलवले.उसगाव येथून या मुलीला आरोपीने पहाटेच्या वेळी पळवून आणले. जंगलात नेऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार करून, हा प्रकार घरी सांगितल्यास तुला ठार मारीन असे सांगून तिला पुन्हा घरी आणून सोडले. त्या मुलीची प्रकृती बघून गणेशपुरी पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी तक्रार केली. भिवंडी पोलीसांनी विरार पोलीसांच्या मदतीने कोलोशी येथून या आरोपीला अटक केली. मात्र, तेथूनच तो फरार झाला. (वार्ताहर)