Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेडाच्या भरात युवकाने केली बँकेची तोडफोड

By admin | Updated: March 11, 2015 22:21 IST

शहरातील दी आप्पासाहेब सावंत महाड बँकेतील केबिनच्या काचा फोडून बँकेचे हजारो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एका माथेफिरूला अटक करण्यात आली आहे.

मुरुड : शहरातील दी आप्पासाहेब सावंत महाड बँकेतील केबिनच्या काचा फोडून बँकेचे हजारो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एका माथेफिरूला अटक करण्यात आली आहे. बुधवारी बँकेचे कामकाज सुरू असताना एकदरातील नारायण पाटील याने वेडाच्या भरात कोयत्याने बँकेच्या काचा फोडल्या. त्यानंतर व्यवस्थापकाच्या केबिनचीही नासधूस केली. या प्रकारामुळे बँक कर्मचारीही भयभीत झाले. बँकेच्या ज्येष्ठ महिला कर्मचारी श्रुती गुरव चक्कर येवून पडल्या. परिसरातील नागरिक व पोलिसांच्या मदतीने या माथेफिरूस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)