Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँकेवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

By admin | Updated: May 24, 2014 02:11 IST

डोंबिवली परिसरातील सीकेपी बँकेच्या ठेवीदार व खातेदारांची शुक्रवारी बँकेत सभा झाली. या सभेत सर्वांच्या सह्यांचे निवेदन बँकेचे जनरल मॅनेजर पी. ई. कांदळगावकर यांना देण्यात आले.

नांदिवली : डोंबिवली परिसरातील सीकेपी बँकेच्या ठेवीदार व खातेदारांची शुक्रवारी बँकेत सभा झाली. या सभेत सर्वांच्या सह्यांचे निवेदन बँकेचे जनरल मॅनेजर पी. ई. कांदळगावकर यांना देण्यात आले. त्यात बँकेच्या संचालक मंडळावर व अधिकारीवर्गावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा खातेदारांच्या वतीने बापू वैद्य यांनी दिला. बँकेचा तीन वर्षांचा ताळेबंद देण्यात यावा. मुंबईतील मातोश्री बिल्डर्सला दिलेल्या ३० कोटींच्या कर्जाची वसुली का केली नाही, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. या वेळी खातेदार व अधिकार्‍यांमध्ये संघर्षही झाला.(वार्ताहर)