Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचार्‍यांची आज निदर्शने

By admin | Updated: May 23, 2014 02:33 IST

प्रशासनाने नेमलेल्या पी.जे. नायक समितीच्या शिफारशींविरोधात शुक्रवारी प्रमुख बँक कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी निदर्शने करणार आहेत

मुंबई : प्रशासनाने नेमलेल्या पी.जे. नायक समितीच्या शिफारशींविरोधात शुक्रवारी प्रमुख बँक कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी निदर्शने करणार आहेत. समिती शिफारशींमुळे सार्वजनिक बँकांचे खासगीकरण होण्याची भीती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस विश्वास उटगी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, या समितीने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपली भागीदारी घटवून ५० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याला १० लाख बँक कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पाच राष्ट्रीय कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. परिणामी या प्रमुख पाच संघटनांतर्फे शुक्रवारी देशभरात निदर्शने केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)