Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचारी बदलणार नोकऱ्या!

By admin | Updated: February 21, 2015 02:50 IST

बँकिंग क्षेत्रात नवीन बँका उतरणार असल्याने बँकेतील अनुभवी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचे प्रकार वाढणार आहेत

मुंबई : बँकिंग क्षेत्रात नवीन बँका उतरणार असल्याने बँकेतील अनुभवी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचे प्रकार वाढणार आहेत. परिणामी अनुभवी कर्मचाऱ्यांकडून आधीची नोकरी सोडण्याचे प्रमाणही नजीकच्या काळात वाढणार आहे, त्यासाठी बँकिंग क्षेत्राने तयार राहावे, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी दिला आहे.सार्वजनिक क्षेत्रात नोकरी सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. कर्मचारी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत नोकरीसाठी जातील. अनुभवी कर्मचारी आता एकाच ठिकाणी नोकरी करण्याऐवजी नवीन नोकरीला पसंती देत आहेत. नोकरी सोडणे, हे एक प्रचलनच ठरणार आहे, असे गांधी म्हणाले. सेबीच्या वतीने आयोजित एका परिसंवादात ते बोलत होते. नोकरी सोडण्यासंबंधीचा ताजा तपशील रिझर्व्ह बँकेकडे नाही; परंतु नजीकच्या काळात बँकिंग क्षेत्रात नवीन बँकांचे पदार्पण होताच अनुभवी कर्मचाऱ्यांना खेचण्याचे प्रमाणही वाढेल, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)