Join us
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे येथे काँग्रेस-भाजपामध्ये जुंपली

By admin | Updated: August 6, 2015 01:51 IST

काँग्रेसच्या २५ खासदारांवर लोकसभा अध्यक्षांनी केलेल्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चात भाजपा कार्यकर्त्यांसोबत

मुंबई : काँग्रेसच्या २५ खासदारांवर लोकसभा अध्यक्षांनी केलेल्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चात भाजपा कार्यकर्त्यांसोबत त्यांची चांगलीच जुंपली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी हस्तक्षेप करीत जवळपास ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. भाजपाचे आशिष शेलार यांच्या घरासमोर हा मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू केली आणित्यानंतर काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्याचे पर्यवसान नंतर हाणामारीत झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत ५० कार्यकर्त्यांना याप्रकरणी ताब्यात घेतले असून, यातील कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)