Join us
Daily Top 2Weekly Top 5

परेचा पूर्वसूचनेविना मेगाब्लॉक, वांद्रे-अंधेरी वाहतूक ठप्प : तासभर लोकलअभावी प्रवाशांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:33 IST

पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर वांद्रे ते अंधेरी दरम्यान शुक्रवारी अभियांत्रिकी ब्लॉक घेण्यात आला. पूर्वसूचना न देता ब्लॉक घेत दुपारी १.१० ते २.१८ वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर कामे करण्यात आली.

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर वांद्रे ते अंधेरी दरम्यान शुक्रवारी अभियांत्रिकी ब्लॉक घेण्यात आला. पूर्वसूचना न देता ब्लॉक घेत दुपारी १.१० ते २.१८ वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर कामे करण्यात आली. अचानक घेतलेल्या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे (८ फेºया) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी (१० फेºया) रद्द करण्यात आल्या. स्थानकांवरील उद्घोषणेतून ब्लॉकची माहिती प्रवाशांना देण्यात आली. मात्र तब्बल एक तास कोणतीही लोकल नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.उपनगरीय रेल्वे मार्गावर ब्लॉक कामे करण्यात येणार असल्यास संबंधित रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबतची माहिती देण्यात येते. मात्र प्रवाशांना पूर्वसूचना न देता पश्चिम रेल्वे हार्बर मार्गावरील वांद्रे ते अंधेरी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर १ तास ८ मिनिटे अभियांत्रिकी ब्लॉक घेण्यात आला. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वांद्रे आणि सीएसएमटी-अंधेरी अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होती. लोकल उपलब्ध नसल्यामुळे विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली. दुपारी २ वाजून २२ मिनिटांनी ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली.