Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाऊनवरील बंदी उठवली

By admin | Updated: December 10, 2014 00:37 IST

गोठीवली येथील इंद्रायणी महिला मंडळाने अखेर ड्रेसकोडची सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आहे.

मंडळाची माघार : ड्रेसकोडवरून टीकेची झोड
नवी मुंबई : गोठीवली येथील इंद्रायणी महिला मंडळाने अखेर ड्रेसकोडची सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आहे. 
सामाजिक भान जोपासणो 
हा या निर्णयामागचा उद्देश 
होता, असे या मंडळाचे म्हणणो आहे.
पनवेल येथील गोठीवलीतील इंद्रायणी महिला मंडळाने महिलांना गाउन घालून घराबाहेर पडण्यास बंदी केली होती. या निर्णयाचे उल्लंघन करणा:यांना 5क्क् रुपये दंडाची घोषणाही केली. 
परंतु त्यांच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर 
गदा आणण्याच्या या 
प्रयत्नाचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंत रबाळे पोलिसांनी या मंडळाने लावलेला फलक ताब्यात घेतला.
मंडळाच्या पदाधिका:यांसोबत पोलिसांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत मंडळाचे म्हणणो जाणून घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोजरे यांनी सांगितले. त्यांच्या निर्णयामुळे कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. त्यानुसार या मंडळाने पोलिसांना दिलगिरी पत्र दिले व माघार घेतली. 
हे प्रकरण विधी विभागाकडे सुपूर्द केले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करता येतील का 
यासंबंधी सल्ला मागवला असल्याचेही गोजरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
मंगळवारी याबाबतचे वृत्त 
लोकमतने प्रसिद्ध करताच बंदी मागे घेण्यात आली.