Join us

मेट्रोसाठी १४ भूखंडांची खैरात

By admin | Updated: January 23, 2015 02:19 IST

मेट्रो प्रकल्पांसाठी पालिकेने तब्बल १४ भूखंडांची अवघ्या एक रुपया नाममात्र दरामध्ये खैरात वाटली आहे़

एक रुपया भाड्यामध्ये दिल्या मोक्याच्या जागामुंबई : मेट्रो प्रकल्पांसाठी पालिकेने तब्बल १४ भूखंडांची अवघ्या एक रुपया नाममात्र दरामध्ये खैरात वाटली आहे़ मोक्याचे भूखंड कवडीमोल दामात भाड्याने देण्याच्या पालिकेच्या या भूमिकेला सुधार समिती सदस्यांनी विरोध दर्शविला़ मात्र मेट्रो जनतेच्या हितार्थ असल्याने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला़कुलाबा ते अंधेरी सीप्झ या मेट्रो मार्गावर १७ स्टेशन्ससाठी मेट्रोने पालिकेकडून भूखंड भाड्याने मागितले होते़ यापैकी १४ भूखंड पाच वर्षांकरिता एक रुपया भाड्याने देण्यात येणार आहेत़ याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत आज मंजुरीस प्रशासनाने आणला होता़ यावर काँग्रेसचे मोहसीन हैदर यांनी मोक्याचे भूखंड नाममात्र भाड्याने देण्यास आक्षेप घेतला़ अशा पद्धतीने चुकीची प्रथा पडेल, असे मत त्यांनी मांडले़ मात्र हा प्रस्ताव लोकांच्या हितार्थ असल्याने अखेर मंजूर करण्यात आला़ परंतु यापुढे पालिकेकडून भूखंड भाड्याने मागितल्यास प्राधिकरण कोणतेही असले तरी बाजारभावानुसार भूखंड द्यावा, अशी सूचना माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली़मुंबई मेट्रो लाइन ३, कुलाबा-वांद्रे-सिप्झ या २० कि़मी़ प्रकल्पाकरिता १७ रेल्वे स्थानके बांधण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने पालिकेकडून भूखंड मागितले आहेत़