Join us
Daily Top 2Weekly Top 5

गडचिंचले साधू हत्याकांडप्रकरणी ४७ आरोपींना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST

कासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू व वाहनचालक यांची जमावाने हत्या केली होती. ...

कासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू व वाहनचालक यांची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात एकूण ४७ आरोपींचा सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

गडचिंचले प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून जवळपास दोनशेहून अधिक जणांवर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी ४७ आरोपींना जामीन मंजूर केला. गडचिंचले येथे चोर समजून १६ एप्रिलला दोन साधू कल्पवृक्ष गिरी महाराज, सुशील गिरी महाराज व त्यांचा चालक नीलेश तेलवडे यांची रात्री जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ केले, तर साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे व एका हवालदाराला सक्तीने सेवानिवृत्ती घेण्याची आणि इतर १५ पोलीस कर्मचाऱ्यांना काही वर्षे मूळ वेतनावर ठेवण्याची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांनी केली होती.