Join us

पुलाच्या कामासाठी उद्या बदलापूर ते कर्जत मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:58 IST

मध्य रेल्वेवरील बदलापूर ते कर्जत दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : मध्य रेल्वेवरील बदलापूर ते कर्जत दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते २ वाजून ३० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल. भिवपुरी रोड स्थानकावर कर्जत दिशेकडे ६ मीटर लांबीच्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी कर्जत, भिवपुरी रोड या ठिकाणी आणि येथून सीएसएमटीकडे जाणाºया प्रवाशांचे हाल होतील.या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाका एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस, सीएसएमटी-नागरकोईल एक्स्प्रेस या एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जत या मार्गाने जातील. भुसावळ-पुणे ही एक्स्प्रेस मनमाड-दौड या मार्गाने जाईल. सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस दुपारी २ वाजून ३० मिनिटांऐवजी दुपारी २ वाजता सुटेल, तर सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.>कर्जतकडे जाणाºया लोकलवर परिणामसकाळी ९ वाजून १ मिनिटांची सीएसएमटी ते कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत उपलब्ध असेल.सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांची सीएसएमटी ते कर्जत लोकल सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनी चालविण्यात येईल.सकाळी १० वाजून ३८ मिनिटे, तसेच १२ वाजून ५ मिनिटांची ठाणे ते कर्जत या दोन्ही लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येतील.सकाळी ११ वाजून १५ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून १३ मिनिटांची सीएसएमटी ते कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.दुपारी १२ वाजून २२ मिनिटांची सीएसएमटी ते खोपोली लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.सीएसएमटीकडे जाणाºया लोकलचे वेळापत्रक विस्कळीतसकाळी १० वाजून ४५ मिनिटांची, सकाळी ११ वाजून १९ मिनिटांची, दुपारी १२ वाजून १ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून १ मिनिटांची कर्जत ते सीएसएमटी लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.दुपारी १ वाजून १ मिनिटांची कर्जत ते सीएसएमटी लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल.दुपारी १ वाजून २७ मिनिटांची कर्जत ते ठाणे लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.