Join us
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरचे जवान सुनील शिंदे लेहमध्ये शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST

बदलापूर : भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे हे लेहमध्ये बचाव कार्यादरम्यान शहीद झाले. शिंदे हे मूळचे बदलापूरचे आहेत. ...

बदलापूर : भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे हे लेहमध्ये बचाव कार्यादरम्यान शहीद झाले. शिंदे हे मूळचे बदलापूरचे आहेत. ते जानेवारी महिन्यात लेहमध्ये बेपत्ता झाले होते.

शिंदे हे भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. सध्या लेह परिसरात त्यांची पोस्टिंग झाली होती; मात्र यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ते बेपत्ता होते. जानेवारी महिन्याअखेर लेह परिसरात हिमस्खलन झाल्याने बचाव कार्यासाठी भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली होती. या बचावकार्यादरम्यान शिंदे यांच्यासह अन्य काही जवान बेपत्ता झाले होते; मात्र बर्फाखाली गाडले गेल्याने त्यांचा शोध लागू शकला नव्हता. अखेर हिमवृष्टी थांबल्यानंतर बर्फ वितळण्यास सुरुवात झाली, त्यावेळी शिंदे आणि अन्य जवान मृतावस्थेत आढळले. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर भारतीय सैन्याने शिंदे यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. ३६ वर्षांच्या सुनील यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

फोटो आहे - ०६ शाहिद जवान