Join us
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये पहिले मराठी भाषा विद्यापीठ!

By admin | Updated: September 5, 2014 02:25 IST

बदलापूर (जि. ठाणो) येथील ‘ग्रंथसखा’ वाचनालयाने भाषा चळवळीला चालना देत मराठी भाषा, इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : मराठी भाषा, साहित्य व्यवहार यांच्या भवितव्याविषयी कायमच निराशावादी सूर उमटत असताना बदलापूर (जि. ठाणो) येथील ‘ग्रंथसखा’ वाचनालयाने भाषा चळवळीला चालना देत मराठी भाषा, इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांची विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे. 
वाचकाभिमुख उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या बदलापूर ग्रंथसखा वाचनालयाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू केले आहे. मात्र पुढील वर्षी 1 जानेवारीपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, असे ग्रंथालयाचे विश्वस्त श्याम जोशी यांनी सांगितले. जोशी म्हणाले, 1935 साली पहिल्यांदा साहित्यिक विष्णू भिकाजी ढवळे यांनी मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी कल्पना मांडली होती. मात्र, कालौघात ती मागे पडली. आजघडीला मराठी शाळांची संख्या झपाटय़ाने घटत आहे. अशावेळी वाचनसंस्कृती संवर्धनासाठी कार्यरत असणा:या ग्रंथालयांची जबाबदारी ओळखत हे विद्यापीठ सुरू करीत आहोत. येथे अभ्यासक्रमांसह राज्यभरातील वाचकांसाठी साहित्य आस्वाद शिबीर, दिवाळी अंकांच्या संपादकांसाठी कार्यशाळा व प्राचीन ते समकालीन मराठी साहित्यावर कार्यशाळा आयोजित केल्या जातील. ािस्ती, बौद्ध व जैन साहित्याच्या अभ्यासासाठी स्वतंत्र दालनेही येथे असतील. त्याचे काम कवयित्री डॉ. अनुपमा उजगरे व रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विद्यापीठासाठी मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुजर्र, संत साहित्याचे अभ्यासक अरविंद दोडे, इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे व लेखक मिलिंद शिंदे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)
 
च्विद्यापीठातील भाषिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रतेचे बंधन असणार नाही.
च्अल्पशिक्षित व्यक्तीही येथे पदवी मिळवू शकेल. यासाठी केवळ वाचनाचे कौशल्य तपासले जाईल