Join us  

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भ्रामक प्रचार करणाऱ्यांना अद्दल घडली : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 5:00 AM

प्रचारात अकारण धुराळा उडविला गेला. अतिशय हीन पातळीवर प्रचार केला.

मुंबई : प्रचारात अकारण धुराळा उडविला गेला. अतिशय हीन पातळीवर प्रचार केला. भ्रामक प्रचार करीत जनतेची फसवणूक करणाऱ्यांना मतदारांनी चांगलीच अद्दल घडविली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.फडणवीस म्हणाले की, विजयोत्सवाचे दोनच दिवस... त्यानंतर मी, माझे मंत्री आणि पक्षाचे हजारो कार्यकर्ते दुष्काळ निवारणाच्या कार्यात पूर्वीसारखेच झोकून देतील. सामान्य माणसांना दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असताना, त्यांचे दु:ख दूर करण्याला प्राधान्य असेल.देशभरात कमळ फुलताना आपली प्रतिक्रिया काय?मुख्यमंत्री : जनता कुणाच्या बाजूने होती आणि आहे, हे आजच्या निकालांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. देशाच्या मनात मोदी, मोदी आणि फक्त मोदीच होते, यावर या निकालांनी आज शिक्कामोर्तब केले. मोदीजींनी अवलंबविलेल्या लोककल्याणाच्या राजकारणाचा, पारदर्शी प्रशासनासाठी जनतेने दिलेला दणदणीत कौल आहे. त्यांच्या असामान्य नेतृत्वावर विश्वसनीयतेची मोहोर उमटली आहे.या विजयाचे कुठले वैशिष्ट्य जाणवते?मुख्यमंत्री : देशसेवेत झोकून देणाºया मोदीजींनी एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची कार्यश्रद्धा आणि त्यांच्यावरील जनसामान्यांच्या विश्वासाचा हा विजय आहे. त्यांचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. सर्व भाजप कार्यकर्ते, बुथप्रमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख, प्रभारी, आमदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अहोरात्र परिश्रमाने अभूतपूर्व विजय संपादित केला.विरोधकांचा प्रचार त्यांच्या अंगलट आला का?मुख्यमंत्री : चौकीदार म्हणून मोदीजींची खिल्ली उडविली गेली, तेव्हा संपूर्ण देश चौकीदार म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहिला. विरोधकांनी जातीपातीचे समीकरण मांडले, पण देशाने या नकारात्मकतेवर मात केली. मोदी सरकार पाडायचेच या त्वेषाने पछाडलेल्यांची जनतेशी नाळ आधीच तुटल्याने, विकासाच्या राजकारणावर जनता शिक्कामोर्तब करणार हे त्यांना उमगत नव्हते. इथेच त्यांच्या प्रचाराची दिशा चुकली. पोलपंडितही चुकले.- हा विजय केवळ मोदी करिष्म्याचा आहे का?मुख्यमंत्री : हो अर्थात! पण हा करिष्मा एका रात्रीतून झालेला नाही. मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या अनेक लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून ३० कोटी नागरिकांना लाभ झाला. मध्यस्थांची यंत्रणा संपवत थेट खात्यात पैसे देणे, हे परिवर्तन प्रथमच जनता अनुभवत होती. आजचा विजय त्याचा परिपाक आहे.- राज्यातील दणदणीत विजयाकडे कसे पाहता?मुख्यमंत्री : मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे काम येणाºया काळात केंद्र आणि राज्यातील सरकार करेल, ही ग्वाही मी देतो.>सत्ता हे साध्य न मानणाºया पक्षाचा पायिक असल्याचा मला अभिमान आहे. विरोधी पक्षात बसावे लागले, तरी चालेल, पण तत्त्वांशी तडजोड कधी केली नाही, असे सांगताना मुख्यमंत्री भावुक झाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019