Join us  

नाणारच्या पार्श्वभूमीवर काजू विकासासाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 4:24 AM

नाणार रिफायनरीमुळे काजूसह इतर फळपिके उद्ध्वस्त होतील, असा आरोप होत असताना आता काजू विकास समितीची स्थापना राज्य सरकारने केली

मुंबई : नाणार रिफायनरीमुळे काजूसह इतर फळपिके उद्ध्वस्त होतील, असा आरोप होत असताना आता काजू विकास समितीची स्थापना राज्य सरकारने केली असून, या समितीचे अध्यक्षपद शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे.काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना येणाºया अडचणी विचारात घेऊन एक निश्चित धोरण ही समिती दोन महिन्यांत तयार करेल आणि शासनाला त्या संदर्भात सल्ला देण्याचेही काम करेल. समिती कोकणातील काजू उत्पादक शेतकरी, उद्योजकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रत्यक्ष तसेच लेखी तक्रारी मागवेल. या समितीच्या सदस्य असे - आ. वैभव नाईक, आ.उदय सामंत, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अजित गोगटे, बाळासाहेब वळंजू, सुरेश बोवलेकर, वासुदेव झाट्ये, बिपीन वरसकर, सुरेश नेरकर, कृष्णा राणे, सचिन दाभोलकर, गणपती गाडगीळ, दयानंद भुसारी, विष्णू देसाई, राजेंद्र मुंबरकर, बाळासाहेब परुळेकर, योगेश काणेकर, शंकर वळंजू, डॉ. हळदेवणेकर, दयानंद काणेकर, संदेश दळवी, रमेश मुळीक, जयदेव गवत, सुनील देसाई, बसवंत नाईक, अनिल मोरजकर, चंद्रशेखर देसाई, सतीश कामत, अमित आवटे.

टॅग्स :नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पनाणार प्रकल्प