Join us
Daily Top 2Weekly Top 5

निलंगेकर यांचा अर्ज मागे

By admin | Updated: December 14, 2014 02:02 IST

सीबीआय न्यायालयाने पक्षकार करण्याचा अर्ज नाकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर- पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाही मागे घेतली.

मुंबई : बहुचर्चित आदर्श घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने पक्षकार करण्याचा अर्ज नाकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर- पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाही मागे घेतली.
न्या. एम.एल. ताहिलयानी यांच्या खंडपीठासोर या याचिकेवर सुनावणी झाली. अद्याप विशेष न्यायालयाने प्रवीण वाटेगावकर यांचा अर्ज मंजूर केलेला नाही. त्यामुळे आताच यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळली जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्या वेळी निलंगेकर-पाटील यांनी ही याचिका मागे घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली. निलंगेकर-पाटील यांनी महसूलमंत्री असताना वादग्रस्त आदर्श सोसायटीला विविध परवानग्या मंजूर केल्या होत्या़ त्यामुळे त्यांना या घोटाळ्यात आरोपी करावे, अशी मागणी करणारा अर्ज वाटेगावकर यांनी विशेष सीबीआय न्यायालयात केला आह़े (प्रतिनिधी)