Join us  

बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा अडविला; पोलिसांचा लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:55 AM

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी आमदार बच्च कडू यांच्या नेतृत्वात राजभवनावर जाणा-या शेतकऱ्यांच्या मोर्चास पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडविले.

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी आमदार बच्च कडू यांच्या नेतृत्वात राजभवनावर जाणा-या शेतकऱ्यांच्या मोर्चास पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडविले. प्रहार जनशक्ती संघटनेने काढलेला शेतकºयांचा हा मोर्चा आझाद मैदानातून राजभवनवर पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी कडू यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.यावेळी सांगून आलो होतो, यापुढे न सांगता राजभवनवर धडकणार असल्याचा इशारा आ. कडू यांनी दिला. सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना मदत करणार नाही का, असा सवाल करत ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. याआधी पोलिसांनी बच्चू कडू यांना नोटीस बजावून मोर्चा नेण्यास मनाई केली होती. तरीही त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आंदोलकांनी पोलिसांची गाडीच अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.आमदार बच्चू कडू म्हणाले की, पुढच्या वेळी आंदोलन करताना काहीही न सांगता थेट राजभवनावर धडकू. राज्यभवनावर मोर्चा काढू दिला नसल्याने आता आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहोत. तसेच पाच जणांचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊन भेट घेणार होते, त्यालाही नकार देण्यात आला.राजभवनावर आंदोलन नाकारल्यानंतर संध्याकाळी आझाद मैदानात आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. शिवसेनेचे विधिमंडळाचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी रास्त असल्याचे सांगत बच्चू कडू यांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला.>राजभवनाकडे कूच...पोलिसांनी मनाई नोटीस बजाविल्यानंतरही गुरुवारी मुंबईत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांनी राजभवनावर मोर्चा नेण्यास प्रारंभ केला. आक्रमक शेतकºयांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. त्यांच्यावर लाठीमारही केला. आंदोलकांनी पोलिसांची गाडीच अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. शेतकºयांनी त्यांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरू ठेवले आहे.

टॅग्स :बच्चू कडू