Join us

बेबी पाटणकर: प्रकरणपोलीस अधिकाऱ्यांचा आज रिमांड

By admin | Updated: June 8, 2015 03:21 IST

ड्रगमाफिया बेबी पाटणकरला मदत केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस कोठडीची मुदत आज, सोमवारी संपत असल्याने या सर्वांना विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले जाईल.

मुंबई : ड्रगमाफिया बेबी पाटणकरला मदत केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस कोठडीची मुदत आज, सोमवारी संपत असल्याने या सर्वांना विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले जाईल.या अधिकाऱ्यांची मालमत्ता कोट्यवधी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पोलीस हवालदार धर्मराज काळोखे याच्या घरात सापडलेली पांढरी भुकटी एमडी नसल्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वळण लागले आहे. सोमवारी गुन्हे शाखा या अधिकाऱ्यांची कोठडी वाढवून मागणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पोलीस निरीक्षक सुहास उमाकांत गोखले, पो़ निरीक्षक गौतम अण्णा गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर केशवसारंग, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम शिवराम माने व पोलीस हवालदार यशवंत शातांराम पार्टे, अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.