Join us

बाबुराव रामिष्टे यांचे निधन

By admin | Updated: November 27, 2015 03:08 IST

माथाडी कामगार नेते बाबुराव रामिष्टे यांचे गुरुवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

मुंबई : माथाडी कामगार नेते बाबुराव रामिष्टे यांचे गुरुवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी १.३0 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून असा परिवार आहे.माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे रामिष्टे यांना अनेक वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा रामिष्टे कामगारांच्या प्रश्नांवर लढत होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. पण दिवाळीपूर्वी पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी ४.४0 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव माथाडी युनियन कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल; त्यानंतर ९ वाजता त्यांच्या वडाळा येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.