Join us  

आझाद मैदानात मेट्रो-३च्या भुयारी कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:54 AM

मुुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (एमएमआरसीएल) सोमवारी मेट्रो - ३ च्या पॅकेज - २ च्या कामांतर्गत आझाद मैदान येथून भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मुख्य सचिव सुमित मल्लिक

मुंबई : मुुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (एमएमआरसीएल) सोमवारी मेट्रो - ३ च्या पॅकेज - २ च्या कामांतर्गत आझाद मैदान येथून भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मुख्य सचिव सुमित मल्लिक, महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकाºयांच्या उपस्थितीत भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.आझाद मैदान ते ग्रँट रोड दरम्यान ४.५ किलोमीटर लांबीचे भुयारीकरण टी-५८ या जर्मन कंपनीच्या टीबीएमद्वारे करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये हे मशिन समुद्रामार्गे वेगवेगळ्या भागांमध्ये दाखल झाले. हे मशिन आझाद मैदान येथे बांधण्यात आलेल्या टीबीएम लाँचिंग शाफ्टमध्ये उतरविण्यात आले. मशिनच्या वेगवेगळ्या सुट्या भागांना जोडण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागला. या वेळी एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या की, प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.दरम्यान, माहिम येथील नयानगरमध्ये दुसºया टीबीएम मशिनद्वारे भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कुलाबा ते सीप्झ पर्यंत ३३.५ किलोमीटर लांबीचे व ६.८ मीटर व्यासाचे बोगदे बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी १७ टीबीएमचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण भुयारीकरण २ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ६ टीबीएम मशिन मुंबईत दाखल झाल्या आहेत. उर्वरित मशिन फेब्रुवारी २०१८ मध्ये मुंबईत दाखल होतील.

टॅग्स :मेट्रो