मुंबई : बीबीसी नॉलेज प्रस्तुत आणि आशिया सी.एम.ओ.द्वारा शिक्कामोर्तब करण्यात आलेल्या ‘द ग्रेटेस्ट मार्केटिंग इन्फ्लुएन्सर २०१६’करिता विको लॅबोरेटरीजची निवड करण्यात आल्याची माहिती विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी दिली. १५ फेब्रूवारी रोजी वांद्रे येथील ताज लॅण्ड्स एण्ड येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान आला. ग्राहकांची उत्पादनासह सेवेप्रति असलेली वचनबद्धता म्हणजे ‘कल्ट ब्रँड’ची ओळख आहे. या कल्ट ब्रँडची विक्री ही उत्पादनांपेक्षा ग्राहकांच्या एकनिष्ठतेवर आधारित असते. कल्ट ब्रँड हा असा ब्रँड आहे; ज्याचा निष्ठावंत ग्राहक हाच खरा आधार असतो. उपभोक्त्यांकरिता जे फक्त उत्पादन असते; ते या ग्राहकांकरिता हा ब्रँड म्हणजे आयुष्यातील अविभाज्य घटक असतो, असे पेंढरकरांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)
विको लॅबोरेटरीज ‘कल्ट ब्रँड’ने सन्मानित
By admin | Updated: March 8, 2017 00:23 IST